सौंदड गावात अवैध दारू विक्रीचा महापुर, तरुण पिळी झाली वेशणाधिन!

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) , दि. 19 ऑक्टोंबर : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे 20 ते 25 ठिकाणी अवैध रित्या देशी, विदेशी, मोहफुलाची आणि बनावट दारू खुलेआम विक्री केली जाते, याला कारण म्हणजे शासकीय यंत्रणा आहे. ज्यांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे, गावात आता 24 तास दारू मिळते, त्या मुळे  नवीन पिळी वेशनाधिन झाली आहे, अती दारुच्या सेवनाने गावातील तरुण पिळी मृत्यू च्या दारात उभी आहे.

गावात अती दारुच्या सेवनामुळे अनेकांचे मृत्यू झाले, असे असले तरी स्थानिक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ता, आणि लोकप्रतीनिधी यांचे देखील सर्रास दुर्लक्ष होत आहे, गावात जाती पातीचे राजकारण स्वताच्या फायद्या पुरते केले जाते मात्र याचा फायदा तरुण पिळीला होताना दिसत नाही, राजकीय नेते आपली जबाबदारी पाळताना दिसत नाही. 

गावात 24 तास अती दारू विक्रीमुळे अनेकांच्या घरात कलह निर्माण होतो, घरात राहणाऱ्या मुलांन सह घरातील म्हाताऱ्या माणसांना याचा त्रास सहन करावा लागतो, गावात अवैध दारु विक्री मुळे काही लोकांना रोजगार मिळाले मात्र अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने त्यांच्या परिवाराचा वाली कोण ? असा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची माहिती पोलिस पाटील, पोलिस विभागाला देतात का ? असाही प्रश्न निर्माण होत आहे, आणि ही माहिती पोलिसांना मिळत असली तर त्यावर कारवाई का केली जात नाही, पोलिस विभाग आणि अपकारी विभाग म्हणजे दारू बंदी विभाग यांची देखील महत्वाची जबाबदारी आहे, एखाद्या दारू विक्रेत्यांवर सतत कारवाई झाल्यास त्याला तडीपार करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आणि पोलिस विभागाची आहे, त्या मुळे वरील विभाग आपली जबाबदारी पूर्ण करतात का ? असा प्रश्न अनेकांना पडतो, कारण गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ?

Leave a Comment

और पढ़ें