- विवीध प्रभागात 4 कोटी 80 लक्ष रु. निधीच्या विकास कामांचे भुमिपुजन.
अर्जुनी मोर, दी. 09 ऑक्टोंबर : आपन सामाजिक न्याय मंत्री असतांना अर्जुनी मोर. शहराच्या सर्व प्रभागातील विकासासाठी करोडोचा निधी दिला. आताही आपन हा विकासाचा वेगवान रथ आजही कायम ठेवला आहे. आज मी वैशिष्ट्य पुर्ण योजनेअंतर्गत आपल्या विशेष प्रयत्नातुन 4 कोटी 80 लक्ष रुपये निधी खेचून आणला. यामुळे शहराचे विकासाला गती मिळणार असून स्थानीक नागरीकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. असेच आशिर्वाद व प्रेम आपनाकडुन मिळत राहील्यास भविष्यात अर्जुनी मोर. शहराचा कायापलट करु असे आश्वासन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
अर्जुनी -मोर शहरातील विवीध प्रभागात वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत 4 कोटी 80 लक्ष निधीच्या कामाचे भुमिपुजन कार्यक्रम प्रसंगी दि. 09 ऑक्टोंबर रोजी ते बोलत होते. यावेळी अर्जुनी -मोर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मंजुषाताई बारसागडे, उपाध्यक्षा ललिताताई टेंभरे, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विजय कापगते, बांधकाम सभापती राधेशाम भेंडारकर, पं.स. सदस्य डाॅ. नाजुक कुंभरे, नुतनलाल सोनवाने, नगरसेवक संजय पवार, ममताताई भैय्या, इंदुताई लांजेवार, सपनाताई उपवंशी, संध्याताई शहारे, दीक्षा शहारे, महीलाध्यक्ष गिताताई ब्राम्हणकर, माजी नगरसेवक देवेंद्र टेंभरे, ओमप्रकाश पवार, नाना शहारे, राजुभाऊ बोरीकर, मंयक जायस्वाल, प्रजय कोरे, नाशिक शहारे, आशु खोब्रागडे, महेश कापगते, बादल लाडे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
