- जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ चे पदाधिकारी.
अर्जूनी मोर, दि. 09 ऑक्टोंबर : गोंदिया जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी गोंदिया यांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ गोंदिया व अर्जुनी मोरगाव च्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन दि. 07 ऑक्टोंबर रोजी दिले आहे.
निवेदनात नमूद माहिती नुसार : आधारभुत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. जिल्हयातील धान उत्पादक शेती बघता हलक्या स्वरुपाचे धान कापने सुरु झालेले आहे. त्या कारणाने शासनाने सुध्दा शेतक-यांसाठी लवकरात लवकर शासन स्तरावर सर्व कार्यवाही करुन लवकरात लवकर आधारभुत धान खरेदी केंद्राचे पर्याय धान उत्पादक शेतक-यांना निर्माण करुन दयावे.
अन्यथा धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत पडुन खुल्या बाजारात व्यापा-यांना बळीपडुन आपली नुकसान करुन घेतो. हे शासनाने समजण्याची गरज आहे. आणी लवकरात लवकर आधारभुत धान खरेदी सुरु करणे गरजेचे आहे. अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया यांना देण्यात आले आहे.
यावेळी जील्हा अध्यक्ष डोमाजी बोपचे, अर्जुनी मोर. तालुका अध्यक्ष ललितकुमार बाळबुद्धे, अध्यक्ष प्यारेलाल गौतम, अध्यक्ष शंकर पटले, अध्यक्ष डॉ. योगेश हरिणखेडे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.