लवकरच होणार 200 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृहाचे निर्माण – आ. विनोद अग्रवाल

  • गोंदियात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू

गोंदिया, दि. 09 ऑक्टोंबर : इतर मागासवर्गीय कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाचा शुभारंभ आज 09 ऑक्टोबर रोजी नागपूर येथून आभासी पद्धतीने (वर्चुअल) पार पडला.

गणेशनगर येथे आयोजित ओबीसी वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभात आमदार विनोद अग्रवाल यांनी आपली उपस्थिती नोंदवून राज्य सरकारच्या या स्तुत्य प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ओबीसी समाजाच्या खांद्याला खांदा लावून सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाचे वर्चुअल उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पाहुणे म्हणून इतर मागासवर्गीय कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम व इतर मान्यवर, आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तर कार्यक्रमात मोठ्या संख्येने ओबीसी संगठने चे प्रतिनिधि, विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते.

यावेळी आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, गोंदिया मुख्यालयात इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा नसल्यामुळे येथे कमी व उच्च शिक्षण घेण्यासाठी दूरवरून येणाऱ्या मुला-मुलींना खूप त्रास सहन करावा लागत होतो. ओबीसी विद्यार्थ्यांचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून गोंदिया शहरात 100 मुले व 100 मुलींसाठी ओबीसी वसतिगृहाची मागणी केली. मंत्रालय स्तरावर या विषयावर सकारात्मक पावले उचलण्यात आली आणि मंजुरीही देण्यात आली.

या विषयावर सकारात्मक पाऊल उचलून आमदार अग्रवाल, जिल्हाधिकारी व समाजकल्याण विभागाशी सातत्याने संपर्क साधून शहरातील गोविंदपूर परिसरात वसतिगृहासाठी जागा निवडण्याच्या प्रक्रियेला चालना देऊन त्याचे बांधकाम लवकर करण्याचे निर्देश दिले. मात्र हे बांधकाम होईपर्यंत मुख्यालयात ओबीसी वसतिगृह सुरू करून ते भाड्याच्या इमारतीत चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, ज्याचे आज अक्षरश: उद्घाटन करण्यात आले.

 

Leave a Comment

और पढ़ें