सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 07 ऑक्टोंबर : राज्यात महायुतीची सरकार आहे. ही सरकार पक्ष फोडून बनली असे अनेक आरोप झाले, आणि त्या मुळेच अनेक ठिकाणातील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही ?, भारतीय जनता पार्टी ने राष्ट्रवादी व शिवसेना या दोन पक्षातील नेत्यांना अवैध मार्गाने जवळ घेत महाविकास आघाडी सरकारला सत्तेच्या दूर केले असे अनेक आरोप सत्ताधारी नेत्यांकडून त्यावेळी केले जात होते, या बाबद अनेक चर्चा देखील त्या काळात होत्या, की दोन्ही पक्षातील नेत्यांना 50 खोके देऊन त्यांना पक्षात आणले होते, यात किती सत्यता आहे, त्या बद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, मात्र चर्चा या होत असतात, प्रवर्तन निर्देशालय ( ईडी ) आणि सीबीआय चा देखील धाक दाखवून त्यांना पक्षात ओढून घेतल्या बाबद देखील त्यावेळी अनेक चर्चा होत्या.
भाजपा सरकार ने तोडून मोडून राज्यात सरकार स्थापन केली मात्र देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असे म्हणत राहिले, मात्र त्यांना उप मुख्य मंत्री पदावर राहूनच समाधान मानावे लागले, आता यात काय चाबी फसली होती हे त्यांनाच ठाऊक, विशेष म्हणजे पहिल्यांदाच राज्यात एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेला पाहायला मिळाले शिवसेना प्रणित शिंदे सरकार स्थापन झाली असली तरी त्यात भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवणार तेच होणार असेही बोलले जात होते.
त्या मुळे राज्यातील जनता देखील विचार करू लागली, राज्यात झालेल्या सत्ता बदला कडे राज्यातील जनता सर्व प्रकार हे पाहत होती, आणि त्याचाच परिणाम म्हणजे लोकसभा निवडणुका मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, राज्यात महा विकास आघाडी चे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले, याचा फटका राज्य सरकार सह केंद्र सरकारला देखील पडला, केंद्र सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी देखील पहिल्यांदा एनडीए च्या माध्यमातून देश्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले.
आता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे, जरी राज्यात महायुती ची सरकार असली तरी, राज्यात घडलेल्या सत्ता बदल मुळे कधी काय होणार हे सांगता येणार नाही, याची भीती पक्ष श्रेसठीला आहे, त्या करीता भारतीय जनता पार्टी मजबूत आणि दमदार असे उमेदवार येत्या निवडणुकीत उभे करणार असे संकेत आहेत.
आता गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर गोंदिया विधान सभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल हे चाबी संघटनेच्या माध्यमातून अपक्ष आमदार म्हणून 2019 मध्ये अपक्ष निवडून आले होते, त्यांनी नुकताच भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला असून त्यांना भाजप मधून उमेदवारी मिळणार असे संकेत आहेत, त्याच बरोबर अर्जुनी मोरगांव विधान सभा क्षेत्रात राष्ट्रवादी चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे आहेत असे असले तरी ही जागा भारतीय जनता पक्षाच्या कोट्यात जाणार असे संकेत आहेत, आणि त्यांच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे संभावित उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले आहेत, कारण या भागात भारतीय जनता पक्षाचा दुसरा कुठलाही मोठा नेता नाही, त्या मुळे मनोहर चंद्रिकापुरे यांची उमेदवारी धोक्यात असण्याचे संकेत आहेत! तर देवरी विधान सभा क्षेत्राचे संभावित उमेदवार माजी आमदार संजय पुराम हे असून तीरोडा येथील आमदार विजय राहांगडाले यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार असल्याचे चित्र आहेत.
गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी चारही विधान सभा जिंकण्याच्या तयारीत आहे, आता राष्ट्रवादी पक्षाला भंडारा गोंदिया असे दोन्ही जिल्हे मिळून एकच जागा म्हणजे तुमसर वर समाधान मानावे लागणार का ? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे, कारण तुमसर येथील आमदार राजू कारेमोरे यांची उमेदवारी निच्छित झाल्याने जन सन्मान यात्रा त्या विधान सभा क्षेत्रात आली होती आणि या यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित होते, मात्र ही यात्रा गोंदिया येथील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अजूनही आली नाही.
त्या मुळे जनतेत विविध चर्चांना पेव फुटले असून ही जागा भाजपला तर जाणार नाही ना ? अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे. 10 ते 15 ऑक्टोंबर पर्यंत राज्यात आचासंहिता लागण्याचे संकेत आहेत, तर निवडणुका या दिवाळी नंतर घ्यावे असे नेते मंडळी कडून बोलले जात आहे, खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की विधान सभा निवडणुका या दिवाळी नंतरच झाल्या पाहिजेत असे अनेकांचे मत आहे. कारण सातत्याने राज्यात सन सुरू असल्याने याचा फटका मतदाता व कार्यकर्त्यांना देखील पडत आहे, त्या मुळे दिवाळी झाल्यावर निवडणुका झाल्यास बरे होईल असे बोलले जात आहे.
आता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार यांना उमेदवारी मिळणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल, पण राष्ट्रवादी पक्षामध्ये तब्बल चार उमेदवार आपल्याला महायुतीची उमेदवारी मिळेल या आशे मध्ये आहेत, त्या मुळे महायुतीची उमेदवारी निश्चित होईपर्यंत या उमेदवारांना गाढ झोप लागणार नाही हे तितकेच खरे आहे! तर विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार असेही बोलले जात आहे.
