गोंदिया, दि. 07 ऑक्टोंबर : रात्रीला दुचाकी वाहन जुपीटर ने गांज्या घेऊन जात असलेल्या इसमाला गोंदिया पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून 5 किलो गांजा सह 2 लक्ष 9 हजार 300 रुपयाचा असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी घनश्याम टोलीराम तुरकर वय 57 वर्षे रा. तेढवा ता. जिल्हा गोंदिया असे आहे.
त्याचे ताब्यातील ज्यूपिटर गाडीवर मधल्या मोकळ्या जागेत एक प्लास्टिक बोरी दिसून आल्याने सदर बाबत चौकशी केली असता उडवा उडविचे उत्तरे देत असल्याने बोरीची पाहणी केली असता प्लास्टिक चे बोरीत प्लास्टिक वेस्टन असलेले 5 पॉकिट दिसून आले. त्यापैकी एक वेस्टन असलेले पाकिट् उघडले असता हिरव्या रंगाचा ओलसर गांजा दिसून आल्याने जप्तीची सविस्तर प्रक्रिया करण्यात आली. सदर ची कारवाई दि. 06 ऑक्टोंबर च्या रात्री 10 : 30 वाजता दरम्यान घडली.
आरोपी घनश्याम टोलीराम तुरकर रा. तेढवा याचे ताब्यातून 5 किलो गांजा, एक ज्यूपिटर मो. सा. मोबाईल व ईतर साहित्य अशी एकूण किंमत 2 लाख 9 हजार 300 रुपये चे साहित्य जप्त करण्यात आलेला असुन आरोपी विरूध्द पोलीस ठाणे – रावणवाडी येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..जप्त मुद्देमालासह आरोपीला रावणवाडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया. गुन्ह्यांचा तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात म.पो.उ.प.नि वनिता सायकर, पोलीस अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, घनश्याम कुंभलवार, यांनी कारवाई केली आहे.
