सडक अर्जुनी, दी. 10 सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्यात 09 सप्टेंबर च्या रात्री पासून दमदार पावसाने हजेरी लावली त्या मुळे नदी व नाले तुडुंब भरले आहेत, काही भागातील झाडांची पडझड झाली अशल्याने वाहतुकीला अळथडा निर्माण झाला आहे, सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड ते फुटाळा या मार्गावर रात्रीला चीच जातीचे झाड पडल्याने शेतकऱ्यांचे मुख्य मार्ग बंद झाले आहे.
हा झाड गावाजव अशलेल्या तलावाच्या पाळीवर गेली अनेक वर्षे पासून उभा होता मात्र रात्री आलेल्या पावसाने सदर झाड पडल्यामुळे सदर मार्ग पूर्णपणे बंद झाले, येथील सरपंच लता गाहाणे यांनी सांगितले की झाड कापणाऱ्या मजुरांना याची माहिती दिली असून सदर झाड कापून मार्ग मोकळा केला जाईल तर दुशरीकडे शेतकऱ्यांच्या शेतात पानी भरल्यामुळे भात पीक सडण्याची भीती आहे, भाताचे पीक आता पोटऱ्यात आले आहे, अश्यात शेतात सतत पानी भरून राहिल्यास शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होण्याची सक्यता नाकारता येत नाही, सध्या पावसाने उसंत दिल्याचे चित्र आहे, त्या मुळे शेतातिल पानी ओसरण्याची शक्यता आहे.