गोंदिया, दी. 10 सप्टेंबर : जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने जिल्ह्याभरात पूर् परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेले एक घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक महीला घराखाली दबल्याची माहिती आहे. महीलेचा शोध उशिरापर्यंत सुरू होते, तर एक जण थोडक्यात बचावला आहे.
दिपिन अग्रवाल वय वर्षे (27) मृतकाचे नाव असे असून, किरण अग्रवाल वय वर्षे ( 50 ) या ईमारतीच्या मलब्या खाली दबल्याची माहिती आहे. अनिल अग्रवाल (52) हे यातून थोडक्यात बचावले आहेत. दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, किरण अग्रवाल यांचा शोध कार्य प्रशासनाच्या वतीने सुरू होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 394