- प्रफुल पटेलांच्या गृह जिल्यात राष्ट्रवादी शरद पवार गट दोन जागा लढण्यास इच्छुक
गोंदिया, दी. 10 सप्टेंबर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची शिव स्वराज्य यात्रा आज दी. 10 सप्टेंबर रोजी गोंदियात दाखल होताच भर पाऊसात कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून शिव स्वराज्य यात्रेचे स्वागत केले, या यात्रेत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, खा. अमोल कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
अजित पवार गटाचे नेते खा प्रफुल पटेल यांच्या गृह जिल्यात आज शरद पवार राष्ट्रवादी गटाची शिव स्वराज्य यात्रा दाखल होताच यात्रेचे रूपांतर सभेत झाले असून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी खा. प्रफुल पटेलांचा चांगलाच समाचार घेतला. तर माजी गृह मंत्री तसेच गोंदिया जिल्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी खा. प्रफुल पटेलांचे विश्वासू माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या परवानगी शिवाय पालकमंत्री असताना कुठलाही काम परवानगी शिवाय करू देत नसल्याचे सांगत आता आपली सुटका झाल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
तर खा. अमोल कोल्हे यांनी येणारा वेळ महाविकास आघाडीचा असल्याचे सांगत तुम्ही आम्हाला पंधरा लाख देणार होते, मात्र पंधरा शे देत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे, तर या शिव स्वराज्य यात्रे दरम्यान प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून गुडू बोपचे यांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले, दरम्यान जयंत पाटलांना ऐकण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.
