सडक अर्जुनी, दी. 10 सप्टेंबर : तालुका काँग्रेस कार्यालयात मौजा खाडीपारच्या संलगटोला येथील नागरिकांनी आपल्या गावातील विविध समस्या मांडल्या त्यात प्रामुख्याने राशन भेटत नसल्याची तक्रार, अंगणवाडी सेविका निवडीप्रकरणी स्थानिकांची निवड करण्यात यावी, तसेच वन जमीनीचे पट्टे तात्काळ देण्यात यावे म्हणून अशी मागणी केली. यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष मधुसुदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे, जिल्हा उपाध्यक्ष रोशन बडोले, सामाजिक कार्येकर्ते अनिल मेश्राम, माजी सरपंच दिनेश हुकरे, मीडिया प्रभारी स्वप्नील ब्राम्हणकर, सेवादल अध्यक्ष संतोष लाडे, सेवादल महासचिव सुर्येभान ठलाल, बंडुजी कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त मागण्यांना घेऊन संबधित यंत्रणेशी संपर्क करून सदरील मागण्या मान्य करण्यात याव्या आणि स्थानिकांना न्याय देण्यात यावा म्हणून मागण्या उचलून धरल्या व भविष्यात त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन सलंगटोला गाव वासीयांना आश्वासन देण्यात आले. तसेच उपरोक्त मागण्याबाबद जिल्हाअध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांना दूरध्वनी वरून माहिती देण्यात आली. यावेळी महेश कोडापे, धनराज मरस्कोले, सतीश नैताम, शांतीलाल कोडापे, होमेश्वर मसराम, दिनेश सयाम, राजेश कोवाचे व इतर ग्रामवासी उपस्थित होते.