“मतांचे राजकारण” जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार बसले रस्त्यावर ?

रस्त्याचे काम कंत्राटदराने वेळेत पूर्ण न केल्याने केला आंदोलन

गोंदिया, दी. 09 सप्टेंबर : जिल्ह्यातिल गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गंनखेरा ते पुरगाव ते सिलेगाव या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन एक वर्षा आधी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये करण्यात आले होते, मात्र वर्ष लोटून सुद्धा कंत्राटदराने रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज राहागडाले आणि तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहागडाले यांनी रस्त्यावर बसून ठेकेदारा विरुद्ध आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांन विरुद्ध आंदोलन केले आहे. हा प्रकार 06 सप्टेंबर रोजी घडला असून जिल्ह्यात सत्ताधारी आमदार व जिल्हा परिषद चे अध्यक्ष यांच्या बाबाद विविध चर्चेला उधाण आले आहे. हा मतांचा राजकारण सुरू अशल्याची चर्चा जन माणसात सुरू आहे. येत्या महिन्यात विधान सभेच्या निवडणुका लागणार असून सत्ता धारी नेत्यांना जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागणार आहे. मत मागायला जागा राहावी हा तर उद्देश नाही ना, असेही दबक्या आवाजात बोलले जात आहे.

भारतीय जनाता पक्षाचे तिरोडा विधानसभा क्षेत्रातील एक मेव आमदार विजय रहागडाले यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील गंखेरा ते पुरगाव असा 6 किलोमीटर चा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले कंत्राटदाराणे काही ठिकाणी कामाची सुरवात सुद्धा केली मात्र वर्ष लोटूनही काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या गावकर्यांनी याची तक्रार आमदार विजय रहागडाले आणि जिला परिषद अध्यक्ष पंकज यांच्या कडे केली असल्याने अध्यक्ष आणि आमदार मोहद्यानी स्वतः रस्त्यावर बसून आंदोलन केले तर आंदोलन स्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील जिल्हा परिषद अध्यक्षानी लोकांन समोर खाली बसविले. येत्या 30 ऑक्टोमबर पर्यत रस्ता पूर्ण करून देऊ असे लेखी आश्वासन आंदोलन स्थळी आलेले आशिष आवडे कार्यकारी अभियंता यांनी दिल्याने हा आंदोलन मागे घेण्यात आला आहे.

तर दुशर्या दिवशी पासून काम सुरु न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा गावाकऱ्यांनी आणि आमदार मोहद्यानी अधिकाऱ्यांना दिला तर गोंदिया जिल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने अधिकाऱ्यांन च्या चुकीमुळे लोकप्रतिनिधीना रस्त्यावर बसण्याची वेळ आले आहे तर दोषी अधिकाऱ्यावर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार महोद्यानी कार्यकारी अभियंता यांच्या कडे केली आहे.

दोष अधिकाऱ्यांचा अशला तरी सत्ताधारी पक्षातील पदाधीकाऱ्यांनाच जनता निवडनुकीच्या वेळी प्रश्न विचारणार आहे. त्या मुळे सत्ता धारी आमदार व जिल्हा परिषद च्या अध्यक्षांनी आपली बाजू सांभाळन्यासाठी ही स्टंट बाजी केली तर नाही ना ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. हा मतांचा तर राजकारण तर नाही ना असे ही दबक्या आवाजात बोलले जात आहे. सत्ता धारी पक्षातील आमदारांना आणि जिल्हा परिषद च्या अध्यक्षांना रस्त्यावर बसण्याची जर वेळ येत असेल तर सामान्य माणूस न्याय मागण्यसाठी कुठे जाणार हा ही प्रशन अनेकांना पडला आहे.

Leave a Comment

और पढ़ें