राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाची “शिवस्वराज्य यात्रा” तिरोडा येथे येणार, पत्रकार परिषदेतून दिली माहिती

गोंदिया, दी. 09 सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या झेंड्याखाली शिवस्वराज्य निर्माण करण्यासाठी लढत आहे. 09 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने पवित्र भूमी शिवनेरी किल्ला, जुन्नर जिल्हा. पुण्यातून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे.

महाराष्ट्राचा सामाजिक न्याय, अस्मिता आणि स्वाभिमाना साठी निघालेली शिवस्वराज्य यात्रा ३५ विधानसभा मतदारसंघातील थांबे गाठून २५०० किमीचा प्रवास करून १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदार संघात प्रवेश करेल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तिरोडा- गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून या यात्रेचा भव्य कार्यक्रम तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शिलेदारांनी या भव्य शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रविकांत बोपचे यांनी गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेतून केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें