शिवरायांची फोटो भिंतीवर लावन्यास तहसीलदारांचा नकार !, रोशन बडोले करणार आमरन उपोषण

सडक अर्जुनी, दी. 05 सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्यातीच्या सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट दिलेली शिवरायांची फोटो भिंतीवर न लावल्यामुळे रोशन बडोले सामाजीक कार्यकर्ते तथा जिल्हा काँग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष 12 सप्टेंबर रोजी पासून तहसीलदार यांच्या विरोधात आमरण उपोषन करणार असल्याचा इशारा दि. 2 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

रोशन बडोले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे त्यांची फोटो 1 जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या औचित्य साधुन तहसील कार्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतीमा ( फोटो ) भेट दिली होती, त्या प्रसंगी अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरून कुमार शाहारे याच्या हस्ते मी स्वतः तहसील कार्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा भेट दिली.

तेव्हा तहसीलदार निलेश काळे, नायब तहसीलदार शरद हलमारे, तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मधुसुदन दोनोडे, तालुका ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष दिनेश हुकरे, पत्रकार डॉ. सुशिल लाडे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतीमा भेट दिली होती, तरी जवळपास 8 महिणे लोटून सुध्या मी स्वतः 15 ऑगष्ट रोजी वरील प्रतीमा केव्हा लावणार असे विचारना केली असता आपण लगेच लावणार आहोत असे मला सांगीतले होते.

परंतु आजपर्यंत तहसील कार्यालयातील भिंतीवर सदर प्रतीमा लागलेली नाही. त्यामुळे मी स्वतः आपल्या कार्यालया समोर दिनांक 11 सप्टेंबर पर्यंत फोटो लावण्यात आली नाही. तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी पासुन वरील विषयाला धरून मी स्वतः तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणला बसनार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून तहसीलदार यांना दिला आहे.

Leave a Comment

और पढ़ें