उद्या केसलवाडा – कोदामेडी येथील नागरिक शासणाच्या विरोधात बसणार आमरण उपोषणाला

  • जंगल वाचविण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ, शासनाकडून जंगलात दिले जमिनीचे पट्टे 

सडक अर्जुनी, दि. ०५ सप्टेंबर : तालुक्यातील ग्राम केसलवाडा – कोदामेडी येथील नागरिक उद्या ६ सप्टेंबर रोजी पासून शासणाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार आहेत, या बाबद चे निवेदन तहसीलदार सडक अर्जुनी यांना दि. २ सप्टेंबर रोजी दिले असून न्याय मिळे पर्यंत उठणार नाही असा इशारा दिला आहे.

पत्रात दिलेल्या माहिती नुसार मौजा केसलवाडा गट क्र.२८१ क्षेत्र ९.५१ हेक्टर आर पैकी एकूण मंजूर क्षेत्र २.१५ हेक्टर आर अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे ) -नियम, २००८ जोडपत्र -२ पहा नियम (८) (ज) अध्यक्ष, जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांचे कार्यालय, गोंदिया प्रकरण क्रमांक- १०५३१/अर्जुनी/मोर कोदामेडी/केसलवाडा/व्य/०३/२३ मौजा – केसलवाडा त. सा. क्र.१५ ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया, दिनांक १७/०३/२०२३ रोजी देण्यात आलेला आदेश हा श्री. शालीकराम ईश्वरदास बन्सोड मु. केसलवाडा पो.ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया यांनी वन विभागाला खोटे दस्ताऐवज तयार करून सदर जागा शासनाची दिशा भूल करून मिळविल्याचे माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या दस्ताऐवजावरून दिसून आलेले आहे.

त्यामुळे आम्ही आपणाला वारंवार या बाबी कळवित  आहोत परंतु दि. २७/०८/२०२४ पर्यंत प्रकरणाची चौकशी न झाल्यास गावकरी उपोषणाला बसणार असे कळविण्यात आले होते. परंतु आपणाकडून कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्यामुळे आम्ही दि. ६ सप्टेंबर रोजी १२ वाजता तहसील कार्यालय सडक/अर्जुनी. येथे बेमुदत चौकशी पूर्ण होई पर्यंत आमरण उपोषण करीत आहोत. यास संपूर्ण शासकीय यंत्रणा जबाबदार राहील. याची दखल घेण्यात यावी. असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

Leave a Comment

और पढ़ें