शिक्षक दिना निमित्त आमदार कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील शिक्षकांचा केला सत्कार

देवरी, दि. 05 सप्टेंबर : आमदार सहसराम कोरोटे यांनी शिक्षक दिना निमित्त देवरी तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला आहे. ज्या शिक्षकांन मुळे आज मी आमदार झालो अश्या शिक्षकांचे ऋण माझ्यावर देखील आहेत त्यामुळे मी देखील समाजाला दिसा दाखविणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिना निमित्त सत्कार करीत असल्याचे आमदार सहसराम कोरोटे म्हणाले.

देशाचे पहिले उप राष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबरला दर वर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असून त्यांच्या जन्म दिनाची आठवण सर्वाना राहावी म्हणून संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षल ग्रस्थ क्षेत्र समजल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यात सेवा देणारे शिक्षक याना या पूर्वी देखील राज्य स्थरीय पुरस्कार मिळाले आहेत.

मात्र तालुका स्थरावर देखील त्यांच्या कार्याची दखल व्हावी या हेतूने आज दि. 05 सप्टेंबर रोजी आमदार सहसराम कोरोटे यांनी शिक्षक दिनाचे अवचित्त साधून तालुका शिक्षण अधिकऱ्यासह केंद्र प्रमुख आणि शिक्षकांचा शाल श्रीफळ तसेच मोमेंटो देऊन सत्कार केला आहे.

तर या पुढे देखील दर वर्षी शिक्षण दिना निमित्त देवरी तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सत्कार करू असे आ. कोरोटे म्हणाले तर या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख तसेच देवरी तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांनी देखील या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येत हजेरी लावली होती.

Leave a Comment

और पढ़ें