सडक अर्जुनी, दि. 05 सप्टेंबर : माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे यांनी आज दि. 05 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला असून काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वर विश्वास करीत त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
गेली अनेक दिवसा पासून जिल्ह्यात कुज बुज होती तसेच त्यांनी काँग्रेस पक्षातून अर्जुनी मोर. विधान सभेची तयारी दर्शवली होती, त्यांच्या राजकारणाची सुरवात काँग्रेस पक्षातून झाली होती असे सूत्र सांगतात, त्यांनी अनेक पक्षात आपले नशीब आजमावले मात्र त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही, त्या मुळे त्या पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर विश्वास करीत त्यांच्या निवास स्थानी त्यांची भेट घेत पक्ष प्रवेश करीत काँग्रेस पक्षाचा दुपट्टा खांद्यावर ओढला आहे. तर पटोले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला पक्ष प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.
त्या मुळे येत्या विधान सभेची तिकीट त्यांना मिळणार का ? अशी चर्चा आता विधान सभेत रंगू लागली आहे, काँग्रेस पक्षातून तब्बल 17 उमेदवारांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून आपण निवडणूक लढण्यासाठी इछुक असल्याची तय्यारी दिलेल्या पात्रातून दर्शविली आहे. त्या मुळे काँग्रेस पक्षासमोर मोठे चेलेंज आहे, की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची तिकीट कोणत्या उमेदवाराला द्यावी, तसेच अर्जुनी मोर. विधान सभा क्षेत्रात बाहेरील उमेदवार जनतेला चालणार नाही ही देखील चर्चा आहे.
- ज्या उमेदवारा सोबत जनता असेल त्याला तिकीट : नाना
सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा काही महिन्या अगोदर आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अनेकांनी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला होता, त्यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की ज्या उमेदवारा सोबत जनता असेल त्याला आपण तिकीट देणार असे आता हे पाहण्यासारखे असेल की येत्या काळात अर्जुणी मोर. विधान सभा क्षेत्राची तिकीट कोणत्या उमेदवाराला मिळते.