सडक अर्जुनी, दि. 05 सप्टेंबर : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे आकडे समोर आले आहेत, येथील डॉक्टर भाग्यश्री शिंदे यांनी महाराष्ट्र केसरी न्युज शी बोलताना सांगितले की सध्या सर्दी, खाशी, डोके दुखी, पोट दुखी, डायरिया, डेंग्यू सह अन्य आजार वाढले असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
रोज 100 ते 120 अशी ओपीडी मध्ये रुग्णांची नोंद होते मात्र आता पोळा व मार्बद या सणा नंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून आज दि. 05 सप्टेंबर रोजी 204 रुग्णसंख्या नोंद झाली आहे. त्या मुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान त्यांनी केले आहे.
ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे राका, पळसगाव, श्रीरामनगर, फुटाडा, पिपरी, भदुटोला, चिखली, सुंदरी, परसोडी, चारगाव, बोपाबोडी, माऊली, शिंदिपार, बिर्री, सह परिसरातील गावातील नागरिक आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी येतात, बदलत्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाण अधिक वाढत आहे.
