- सौंदड गावातील अनेक रस्त्यांचे खडीकरण आजही झालेले नाही, कच्च्या मार्गावरून नागरिकांची पायपीट
सडक अर्जुनी, दि. 05 सप्टेंबर : तालुक्यातील सौंदड ग्राम पंचायत अंतर्गत येणारे कृष्णवार्ड येथील कैलास चन्ने यांच्या घराजवळील रस्ता व नाली गेली अनेक वर्षे पासून ना दुरुस्त अवस्थेत असल्याने येथील नागरिकांना रस्त्यांनी चालताना मोठा त्रास सहन करावे लागत आहे, या भागात गेली 15 ते 20 वर्षे पासून लोक वस्ती आहे. गेली अनेक सरपंच आली व गेली मात्र याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाचे या परिसराकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या भागात काही ठिकाणी नाल्या व रस्त्यांचे बांधकाम झाले असले तरी ते निकृठ दर्जाचे करण्यात आले असून आज घडीला ते फुटलेल्या अवस्थेत आहे. सौंदड गावातील अनेक रस्त्यांचे खडीकरण आजही झाले नसून कच्च्या मार्गावरून नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
गावाचा विकास करण्यासाठी, गावातील नागरिक सरपंच यांची निवड करतात मात्र ठेकेदारी व कमिशन खोरी मुळे गावात झालेली अनेक विकास कामे अल्पावधीतच तूट फूट झालेल्या अवस्थेत आज घडीला आहेत, त्या मुळे काम केले हे बोलन्या पुरतेच केली जातात का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. हेच नाही तर गावातील अनेक भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. घान पाणी वाहून नेण्यासाठी अनेक ठिकाणी नाल्यांची निर्मिती करण्यात आली नाही. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होतो, सौंदड गावात विकास कामाची आवश्यकता असून स्थानिक प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. गावातील नाली व रस्त्यांचे नव निर्माणकार्य ग्राम पंचायत प्रशासनाने करावे अशी मागणी नाव न छापण्याच्या सर्यातीवरून गावकऱ्यांनी केली आहे.