- तक्रार करून देखील शासकीय यंत्रणा बग्याच्या भूमिकेत, गावकऱ्यांचा पत्रकार परिषदेत आरोप.
- शासकीय यंत्रणेच्या विरोधात केशलवाडा येथील गावकरी करणार आमरण उपोषण.
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 30 ऑगस्ट : 2024 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात नेहमीच अनेक चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात, याला कारण म्हणजे शासकीय यंत्रणा आहे. कमी वेळात धनवान होण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा वापर करून खर्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचा कारभार या तालुक्यात गेली अनेक दशकांपासून सुरू आहे. आणि त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.
असाच एक बनावट प्रकार सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम केसलवाडा येथे घडला आहे, याची माहिती पत्रकार परिषद घेऊन येथील गावकरी वामन खोटेले, मनोहर बहेकार, अकोष हत्तीमारे, पितांबर मुनिस्वर, सुरेश खोटेले, प्रभुदाश खोटेले सह अनेकांनी दिली आहे. केसलवाडा गाव हे गट ग्राम पंचायत कोदामेडी अंतर्गत येते, गावाला लागून असलेल्या मोठ्या झाडांच्या जंगलात ( वन विभागाच्या जागेत ) एका नागरिकाला एक, दोन नाही तर तब्बल सहा येक्कर जमिनीचे पट्टे मिळाले आहेत, ही बाब गावातील नागरीकांना माहीत होताच गावातील काही नागरिकांनी ग्राम पंचायत येथे माहितीचा अधिकार चे अर्ज लाऊन माहिती मागवली असता ग्राम पंचायत कार्यालय कडून सदर प्रकरणातील माहिती उपलब्ध नाही असे लेखी दिले आहे. प्रकरणात जोडलेल्या दस्तावेज नुसार ज्या वेक्तीला जमिनीचे पट्टे मिळाले आणि ज्या वेक्तीच्या नावाने ग्राम पंचायत ने ग्राम सभेत ठराव मंजूर करून दिला तो बनावट आहे असे लक्ष्यात येते.
म्हणजे तो ठराव अर्जदार यांच्या नावाचा नसून दुसर्या वेक्तीच्या नावाचा असून ठिकाण देखील दूसरे आहे. त्या कागद पत्रांमध्ये खोड तोड करून बाजूला आपले नाव लिहून सदर ठराव वापरण्यात आले आहे. तर वन विभागाणे दिलेला मौका पंचनामा देखील बनावट आहे. त्यावर ज्या वन रक्षकाची सही व शिक्का आहे तो देखील बनावट आहे. वन हक्क समितीचे ठराव देखील बनावट असून सही व शिक्के देखील बनावट असल्याची माहिती पत्रकार परिषदेत गावकऱ्यांनी दिली आहे. सदर वन विभागाच्या जागेवर कुठल्याही प्रकारचा अतिक्रमण नसताना देखील वन विभागाने किंवा जिल्हाअधिकारी कार्यालयाने अर्जदार शालिकराम ईश्वरदास बनसोड यांना वन विभागातील 281 क्षेत्र 9.51 हेक्टर आर पैकी 2.15 आर हेक्टर म्हणजे जवळपास सहा येक्कर जमीन कशी मंजूर करून दिली हा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
विशेष म्हणजे जी जमीन वन विभागाने मंजूर करून दिली त्या जागेत गावातील नागरिक जनावरे चारण्यासाठी नेतात तर याच ठिकाणी शमश्यान भुमी देखील आहे, तर ज्या नागरिकाला पट्टे मंजूर झाले तो वेक्ती श्रीराम नगर येथील पुनर्वसित योजनेचा लाभार्थी आहे, असे असले तरी वन विभाग आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाने डोळे झाकून पट्टे दिले का ? असा सवाल उपस्थित करीत गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. या प्रकाराला उजेडात आणण्यासाठी नागरिकांनी स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिकारी गोंदिया यांना अनेक वेळ निवेदने दिली मात्र गावकऱ्यांचे आवाज अधिकाऱ्यांपर्यंत अजून पोहचले नसल्याने दिलेल्या निवेदनावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
या उलट अर्जदार यांना जमिन मोजून देण्यात यावी असे आदेश काढण्यात आले आहे. आरोप आहे की अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने चिरी मिरी चा वेव्हार झाला असावा, त्या मुळे प्रकरण शांत आहे. अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी केसलवाडा येथील गावकरी 6 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती ( दि. 29 रोजी ) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्या मुळे सदर प्रकरणात शामिल असलेल्या चिरी मिरी घेणाऱ्या अनेक कथित अधिकारी कर्मचारी यांच्या नौकरिव गदा येणार हे निश्चित आहे. सडक अर्जुनी वन परिक्षेत्रअधिकारी कार्यालय अंतर्गत हे प्रकार आहे.
