सडक अर्जुनी, दि. 29 ऑगस्ट : मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायत सौंदडच्या वतीने बैलपोळा उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. 02 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन केले गेले असून दुपारी 02 वाजता पर्यंत सर्व बैल जोड्यांना स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. महत्वाचे म्हणजे, बैलजोडी ही स्थानिक असावी. ही स्पर्धा स्थानिक हिरवाजी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष आहे. सरपंच हर्ष मोदी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले गेले असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर प्रथम बक्षीस 5100, द्वितीय बक्षीस 3100, तृतीय बक्षीस 2100 असे असणार अशी माहिती हर्ष मोदी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्ष मोदी यांनी केले आहे.
