- अर्जुनी मोरगाव येथे संविधान जागर यात्रेचे आयोजन.
अर्जुनी मोर, दि. 29 ऑगस्ट 2024 : मागील 75 वर्षापासून कोट्यावधी भारतीय लोक एकत्र राहत आहेत. कोणतेही अंतर्गत युध्द झाले नाही. किंवा यादवी माजली नाही. 75 वर्षापासून संसद, न्यायपालीका, आणि कार्यपालीका कोणत्याही अडथळया शिवाय आप आपले कामकाज करीत आहेत. याला एकच प्रमुख कारण म्हणजे भारतीय राज्यघटना- भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च कायदा असून भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. ती भारतीयांच्या जिवनाचा प्रमुख आधार आहे.
देशाच्या सांस्कृतीकि भाषीक विविधतेच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या संवर्धनासाठी भारतीय राज्यघटनेत अनेक तरतुदी आहेत. संविधानातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लावने आणि त्याचे पावित्र राख्यण्याची जबाबदारी संविधानाने सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधिशांच्या खंडपिठाने केश्वानंद भारती खटल्यामध्ये निकाल देतांना संविधानाच्या रचनेच्या मुलभुत सिध्दांताची स्पष्टता केली आहे. राज्यघटनेचे सर्वोचत्व, लोकशाही शासनाचे स्परुप, नागरीकांचे मुलभुत, अधिकार या सारख्या मुलभुत वैशिष्टयामध्ये संसदेला सुधारणा करता येणार नाही असे स्पष्ट केले असतांना सुध्दा आणिबाणीच्या काळात केलेल्या 42 व्या घटनादुरुस्तीमध्ये संविधानाच्या लोकशाही स्परुपाचे हुकुमशाही राजवटीमध्ये रुपांतर करण्यात आले होतें. ही भारतीय संविधानाची सर्वांत मोठी हत्या होती.
असे मत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंचावरून बोलताना व्यक्त करीत काँग्रेस पक्षावर नाव न घेता जहरी टीका केली आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये संविधान जागर यात्रेचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते.
दरम्यान ते पुढे म्हणाले केवळ दोन वर्षात जनतेने हुकूमशाही प्रवृतीचे सरकार उलथून पाडले आणि 44 व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानाला पुन्हा लोकशाहीचे स्वरुप प्राप्त करुन दिले. यावरुन संविधानात बदल कोणी केला हे दिसून येते असेही ते म्हणाले.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजकुमार बडोले, अॅड. वाल्मीक (तात्या) निकाळजे जेष्ठ मानव अधिकार कार्यकर्ता महाराष्ट्र, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र, राजेंद्र गायकवाड कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू, सस्थापक अध्यक्ष, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटना नाशिक, योजनाताई ठोकळे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आबेडकर फाऊडेशन, भारत सरकार नवी दिल्ली अध्यक्षा, आधार महिला कौशल्य विकास केंद्र मुंबई, आकाश अंभोरे फुले, शाहू , आंबेडकरी कार्यकर्ता अकोला, विजय गव्हाळे संस्थापक अध्यक्ष बौद्ध युवक संघ, नागसेन पुंडके प्रदेश सचिव, भा.यु.मो., सह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभे च्या निवडणुका वेळी एक हाती सत्ता आल्यास संविधान बदलणार, आरक्षण सपणार, असे खोटे नॅरिटीव पसरऊन भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचं काम केलं हे लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या वतीने संविधान जागर यात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करून जनतेला जागृत करण्याचं काम केलं जात आहे. अर्जुनी मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संविधान जागर यात्रेचे समापन करण्यात आले. दरम्यान पुस्तकाचे विमोचन करण्यात आले असून संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
