नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा! :  आ. मनोहर चंद्रिकापुरे

अर्जुनी मोर., दि. 22 ऑगस्ट : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला कुठल्या दिशेने जायचे आहे हे आजच्या युवा पिढीने ठरविणे गरजेचे आहे. मात्र आजची युवा पिढी नेमकी कुठल्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे न समजणारे कोडेच आहे. त्यामुळे आपल्याला आपले भविष्य उज्वल घडवायचे असेल तर एक निश्चित दिशा आजच्या युवा पिढीने ठरविणे काळाची गरज आहे.

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत स्वतःच्या विकास घडवून आणता येणे शक्य नाही. विकासच घडवून आणायचा असेल तर नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा! असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील खांबी पिंपळगाव येथे रक्षाबंधन व मानसून मंडई निमित्त युवा एकता ग्रुप खांबीच्या सौजन्याने मराठमोळी लावणी कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजकुमार बडोले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य लायकराम भेंडारकर, चामेस्वर गहाणे, पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे, प.स. सदस्य संदीप कापगते, डॉ. अजय लांजेवार, नगरसेवक दाणेश साखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल दहिवले, शिवसेना जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल, माजी जि. प. सदस्य रत्नदीप दहिवले, सरपंच निरुपाताई बोरकर, सरपंच प्रतिभाताई बोरकर, सरपंच सचिन डोंगरे, माजी उपसरपंच प्रमोद डोंगरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रेवचंद फुंडे, शिक्षक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन योगेश लोणारे यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें