वाचनालय हे ऊर्जा निर्मिती चे केंद्र : आमदार मनोहर चंद्रिकापुरे

अर्जुनी मोर., दि. 22 ऑगस्ट : ज्यांनी आपल्या जीवनात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले ते आपल्या जीवनात यशस्वी झाले. ज्यांना अभ्यासाची आवड आहे ते वाचनालयात बसून आपले लक्ष एका विशिष्ट ध्येयाकडे ठेवत असतात ते कुठल्याही परीक्षेत मागे पडत नाही. कुठली ही परीक्षा कितीही कठीण असली तरी त्या परीक्षेत ते यशस्वी होतात.

त्यामुळे ज्यांनी वाचनालयाच्या माध्यमातून यश संपादन केले अशा व्यक्तींनी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोन समोर ठेवून एक आदर्श समाज कसा घडविता येईल या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. वाचनालय हे ऊर्जा देणारे प्रभावी माध्यम असल्याने वाचनालयाच्या उपयोग आजच्या विद्यार्थी आणि युवा पिढीने आपल्या जीवनात करून घ्यावा असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कानोली येथील वाचनालय इमारतीचे लोकार्पण व सत्कार कार्यक्रम प्रसंगी उद्गघाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजकुमार बडोले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जी. प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जी.प. सदस्य लायकराम भेंडारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाने, भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, प. स. सदस्य चेतन वळगाये, सरपंच चेयाताई अंमले, राजहंस ठोके, ग्रा. प. सदस्य, अमर कोडापे, युवराज कापगते, संजय दरवडे, योगेश काटेंगे, गोविंदा मळकाम, हेमलता गवड, छाया अंमले, कल्पना राखडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत नरेश फुंडे, नितेश अंमले, भूपेश मेश्राम, दुर्गा ताई रहेले, राजेश गावड, सुहास रहिले, यांचं सत्कार उपस्थित मान्यवर याचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपसरपंच जागेश्वर मते यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें