आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते चावडी बांधकामाचे भूमिपूजन

अर्जुनी मोर., दि. 22 ऑगस्ट : तालुक्यातील बाक्टी येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत चावडी बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाने, पंचायत समिती सदस्य पुष्पलता दुरुगकर, सरपंच राजगिरे ताई, उपसरपंच गुलशन सांगोडे, हरिराम हेमने शंकर देवरे, विनोद गावड, जितेंद्र शेंडे, शंकर बडवाईक, बाळकृष्ण दुरुगकर, मारुती इस्कापे, परशराम मांढरे, कैलास हेमने, नरेश दिघोरे, शंकर मांढरे, गोपी राजगिरे, गिरधारी राऊत, हिवराज राजगिरे, यांचे सह गावातील प्रतिष्ठित मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांशी विविध समस्या संदर्भात चर्चा घडवून आणली व समस्या मार्गी लावण्याचे आश्ववासन दिले.

Leave a Comment

और पढ़ें