आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

सडक अर्जुनी, दि. 22 ऑगस्ट : हनुमान मंदिर खोडसिवनी समोरील आकरावर आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे स्थानिक विकास निधीतिल सामाजिक सभागृह बांधकाम किंमत 10 लक्ष रुपये चे भूमीपुजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते, सरपंच गंगाधर परसुरामकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी प. स. सदस्य डॉ. आर. बी. वाढई, उपसरपंच सत्यवान नेवारे, लोहार समाज अध्यक्ष दुर्योधन बावणे, कोहळी समाज अध्यक्ष दामोदर परसुरामकर, ढिवर समाजा तर्फे चंद्रशेखर मेश्राम, सोनार समाज अध्यक्ष हेमराज हाडगे, गोवारी समाज अध्यक्ष भोजराम सुर्यंवंशी, चर्मकार समाजा तर्फे अजय उके,  मंदिर समीती उपाध्यक्ष महादेव कापगते, सचिव रामदास मस्के, सदस्य मनोहर बाबुराव परसुरामकर भोला कापगते, व्यंकट परशुरामकर, अस्तिक परशुरामकर , प्रमोद परशुरामकर, देवेंद्र परशुरामकर, उमराव परशुरामकर, मिलिंद परशुरामकर, चंद्रशेखर मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश बोरकर तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर परशुरामकर, भोजराज सूर्यवंशी, हेमराज हाडगे, मंगलदास मेश्राम,  व इत्यांदी मान्यवराचे उपस्थित संपन्न झाले. कार्यक्रमाचे संचालन म. गांधी तंटामुक्त समीती अध्यक्ष मनोहर परसुरामकर तर प्रास्ताविक मंदिर समीती अध्यक्ष भृंगराज परसुरामकर यांनी केले कार्यक्रमाला खोडशिवनी येथील विविध समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें