- ग्राम पंचायत सौंदड च्या धर्तीवर रेंगेपार ग्राम पंचायत प्रशासनाने केली अंमल बजावणी
सडक अर्जुनी, दि. 21 ऑगस्ट 2024 : तालुक्यामध्ये प्रख्यात असलेले सौंदड ग्राम पंचायत कार्यालयाकडून मागील काही महीन्यापुर्वी वाळू माफियांवर स्वतः सरपंच हर्ष मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली होती, वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले होते, त्यावर महसूल विभागाकडून लाखो रुपयांचा दंड ही वसूल करण्यात आला आहे, त्या मुळे गावातून विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दनानले होते, हे चित्र तालुक्यातील जनतेनी पाहिलं आणि असे प्रयोग आपणही केले पाहिजे असा हेवा करीत ग्राम पंचायत रेंगेपार/दल्ली यांनी चक्क ग्राम सभेत नागरिकांच्या अनुमतीने ठरावच मंजूर केला आहे, की गावातून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्या संबंधाने, त्या मुळे या भागातील वाळू माफियांची आता पंचायत होणार हे निश्चित आहे.
दि. 14 ऑगस्ट रोजी ग्राम पंचायत कार्यालय येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, सदर ग्राम सभेमध्ये वाळू तस्करी वर नियंत्रण घालण्यासाठी गावातील नागरीकांनी अर्ज सादर केले असता, सरपंच वनिता कोरे यांनी लगेच गावकऱ्यांच्या अर्जावर विचार करून रेंगेपार या गावातून कुठल्याही प्रकारची विना परवाना वाळू तस्करी करता येणार नाही असा ठराव सर्वांनुमते मंजूर केला आहे
दि. 19 ऑगस्ट रोजी गाकऱ्यांची विषेश मिटिंग घेऊन गावातील सर्व पदाधीकारी यांच्या समक्ष वाळू तस्करी वर देखरेख कोणत्या प्रकारे ठेवणे व त्याच्यावर कार्यवाही कोणत्या प्रकारे करणे याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्या मध्ये वाळू तस्कर नियंत्रण करण्यास समोर येणारा रेंगेपार/दल्ली हा दुसऱ्या क्रमांकाचा गाव ठरलेला आहे.
ठरावाची प्रतिलीपी तहसीलदार, पोलीस स्टेशन डुग्गीपार व फॉरेस्ट ऑफिस कोहमारा यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. ग्रामसभेत विषेश समिती तयार करून वेगवेगळ्या वार्डामधुन एकूण 35 सदस्यांची नेमणुक केली असून यामध्ये सरपंच- वनिता कोरे, तलाठी काळे, प्रिया कान्हेकर बीट गार्ड, पोलीस पाटिल उमेद्र मेश्राम, उपसरपंच नरेश मौजे, त.मु.स. अध्यक्ष घनश्याम कापगते सह जेष्ठ नागरिकांमध्ये कैलास डोंगरवार, नरेंद्र डोंगरवार, हंसराज कठाणे व इतर नागरीकांचा समावेश आहे.
तालुक्यातील महसूल विभागाकडून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या माफियांवर पाहिजे त्या पद्धतीने कारवाई केली जात नाही त्या मुळे आता ग्राम पंचायत आणि गावातील नागरीकांना पुढाकार घ्यावे लागले आहे.