गोंदिया, दि. 20 ऑगस्ट 2024 : जिल्ह्यातील ग्राम एकोडी येथील रहवासी राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांची सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्र क्र. अहत 1610 प्र. क्र. 64/ / 10/11- अ दि. 04/02/2011 चे परिपत्रकातील परिच्छेद 4 (1) नुसार नागपुर विभाग नागपुर महाराष्ट्र राज्य यांचे संदर्भिय पत्र क्र. मशा / कार्या – विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति/ सीआर -11/2010/ कावि-20 /2024 नुसार विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति, विभाग नागपुर महाराष्ट्र राज्य अंतर्गत समितिवर राजेशकुमार तायवाडे यांची अशासकीय सदस्य पदी म्हणून नियुक्ति करण्यात आलेली सदर नियुक्तिचे पत्र विजयलक्ष्मी बिदरी ( भा.प्र.से ) विभागीय आयुक्त नागपुर यांनी राजेशकुमार तायवाडे यांना दिले आहे.
राजेशकुमार तायवाडे यांनी आपल्या नियुक्तिचे श्रेय खासदार प्रफुलभाई पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजेश कटरे व अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांना दिलेले आहे.