धानाला एक हजार रूपये बोनस जाहीर करूनच निवडणुकीला सामोरे जा : बाळबुद्दे व रामटेके यांची निवेदनातून मागणी

गोंदिया, दि. 20 ऑगस्ट : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ अर्जुनी/मोरगांव चे अध्यक्ष-ललीतकुमार बाळबुद्धे, उपाध्यक्ष सुभाष देशमुख,  सचिव अरुण गजापुरे, व ऍड पोमेश रामटेके यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार अर्जुनी/मोर. यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ ‍शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज 20 ऑगस्ट रोजी लेखी निवेदन देत धानाला एक हजार रूपये बोनस जाहीर करूनच निवडणुकीला सामोरे जा अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की : विदर्भातील धान उत्पादक शेतकरी खुप अडचणीमध्ये सापडलेला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न कमी प्रमाणात होणार आहे. या नैसर्गिक आपदेची सरकारणी जाणीव ठेवत विदर्भातील शेतकरी जगला पाहीजे.

आणि पुढे शेतकरी राहीला पाहीजे हे उददीष्टे ठेवुन धान उत्पादक शेतकऱ्याला सरकारणी एक हजार रूपये बोनस जाहीर करूनच निवडणुकीला सामोरे जावे असे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ तालुका अध्यक्ष ललीतकुमार बाळबुदधे, ॲड. पोमेश रामटेके अर्जनी/मोर विधानसभा चे संभावित उम्मेदवार आणि अन्य यांनी मागणी केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात धानाला सात शे रूपये बोनस जाहीर करूण सामोरे गेलेले होते.

त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्याला सुगीचे दिवस लागले होते. तरी या नम्र निवेदनाने आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवित आहोत. असल्याची माहिती निवेदनात नमूद केली आहे. 

Leave a Comment

और पढ़ें