गोंदिया, दि. 20 ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या 21 ऑगस्टला म्हणजे उद्या दुपारी 01 : 30 वाजता दरम्यान गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागता करिता मनसे कार्यकर्त्यांनी गोंदिया जिल्ह्यात व शहरात मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागता साठी होर्डिंग लावल्या आहेत, मात्र त्यांच्या होर्डिंग वर भावी मुख्यमंत्री असे उल्लेख केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उद्याच्या भेटी मुळे येत्या विधान सभा निवडणुकीत काय बदल होणार आणि ठाकरे यांची काय भूमिका असणार हे पाहण्यासारखे असेल तर राज ठाकरे यांच्या कडून गोंदियातील विधान सभेवर दावा तर केला जाणार नाही ना हे ही पाहण्यासारखे असेल. विधान सभा निवडणुकीच्या काळात ठाकरे यांची कार्य कर्त्यांसोबतची ही भेट अनेकांना विचार करायला पाडणारी आहे. एकीकडे उद्या भारत बंद असला तरी दुसरीकडे राज ठाकरे यांचे राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत भेटीचे दौरे आहेत.
