गोंदिया, दि. 20 ऑगस्ट : ऐका ग्राम सेवकाला गावातील नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी ( ता.19 ) रोजी गोंदिया तालुक्यातील ग्राम नवरगाव कला येथे उघडकीस आला आहे, तर सदर घटनेचा व्हिडिओ देखील वायरल झाला आहे. सदरप्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असुन परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
जीबी न्युज ने दिलेल्या माहिती नुसार, श्री. चौधरी असे वादग्रस्त ग्रामसेवकाचे नाव असून तो सध्या गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथे पदस्त आहे. संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन संपात सहभागी असताना तो सोमवार ( ता.19) च्या सायंकाळीं 08 वाजताच्या सुमारास गावातील ऐका महीलेच्या घरात जावून त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.
https://x.com/maharashtrakes1/status/1825889630702502133?t=IBkN5jaSFY92e-MWR77b5w&s=19
अश्यात महिलेने आरडाओरड केल्याने तिच्या घरातील मंडळी धावून आली. सदर प्रकार उघडकीस येताच गावातील नागरिकांनी सदर ग्रामसेवकाला भर चौकात चांगलाच चोप दिला असून त्याला एका खांबाला बांधून ठेवले असल्याचे ही बोलले जात आहे. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडविले. सदर प्रकाराला घेवून मध्य रात्री पर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात राडा होत राहिल्याची गुप्त महिती प्राप्त झाली.
परंतु सदर प्रकरणाची अद्यापही तक्रार झाली नसल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. या संबंधात गावातील सरपंच व सदर ग्रामसेवकांची प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही वेक्तीनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र सदर घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असुन प्रशासनाची मान खाली घालनाऱ्या ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी कोणती कारवाही करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
केवल कांबळे – अध्यक्ष तंटा मुक्त समिति नवरगाव (कला) : गावात घडलेला प्रकार सत्य असून सदर प्रकारामुळे गावाच्या इभ्रतीला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे सदर व्यक्तीवर कारवाही होणे अपेक्षित आहे.
भोजराज बावनकर – ग्रामस्थ नवरगाव (कला) : महिलांच्या आब्रू वेशीवर टांगणाऱ्या ग्रामसेवकावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.