- वृक्षधरा फाउंडेशनचे व खालसा सेवा दलाचे ही सत्कार
गोंदिया, दिनांक : 16 ऑगस्ट 2024 : श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सवातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टिळक गौरव पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून खासदार प्रफुल पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, सभापती संजय टेंभरे, मुनेश रहांगडाले, पूजा अखिलेश सेठ राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते गुड्डू बोपचे यांच्या हस्ते गोंदिया जिल्यातील गुणवंत विद्यार्थी, सेवाभावी संस्था तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पात्रकारांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.
गोंदिया जिल्यात मागील १५ वर्षा पासून श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्यातील १० व्या तसेच १२ व्या वर्गात जिल्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा सोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सत्कार करण्यात येत असून उपस्थित पाहुण्यांनी देखील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेत सुभेक्षा दिल्या.
यात पत्रकारिता क्षेत्रात दीर्घ काळ सेवा देणारे गोंदियातील वरिष्ठ पत्रकार मोहन पवार याना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या टिळक गौरव पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले तर स्व. मनोहरभाई पटेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या संपादकीय पुरस्कार या वर्षी रूद्र सागर न्युज पेपरचे संपादक : बबलू मारवाडे याना सन्मनींत करण्यात आले.
तर स्व. रामकिशोर कटकवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा वृत्तवाहिनी पुरस्कार या वर्षी जय महाराष्ट्र न्यूज चॅनल चे राकेश रामटेके याना देण्यात आले तर स्व. स्वातंत्र्य सैनानी हिरालाल जैन यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार या वर्षी तरुण भारत चे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र तुरकर याना देण्यात आले आहे. तर स्व संतोष अग्रवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा शोध वार्ता पुरस्कार महेंद्र गजभिये याना देण्यात आला तर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार पक्षी मित्र निसर्ग प्रेमी डॉ. शरद मेश्राम याना देण्यात आला.
सहयोग मल्टी स्टेट को ऑप रेटिव्ह सोसायटी च्या वतीने गोंदिया जिल्यात १० व्या १२ व्या वर्गात जिल्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर पत्रकार संजय राऊत यांच्या मुलीने १० व्या वर्गात ९५% गुण मिळविल्याने अनुष्का राऊत यांचा देखील सत्कार या कार्यक्रमा दरम्यान करण्यात आला तर या वर्षी प्रथमच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीत कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्था म्हणून वृक्षधारा फाउंडेशन ने गेल्या ९ वर्षात हजरो झाडांची लागवड केल्याने वृक्षधारा फाउंडेशनचा सत्कार करण्यात आला.
तर गोंदिया शहरातील खालसा सेवा दलाच्या वतीने वर्ष २०१८ पासून गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि बाई गंगा बाई शाशकीय रुग्णालयात उपचारा करिता आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गेल्या ६ वर्षा पासून निरंतर मोफत जेवण देत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल श्रमिक पत्रकार संघ गोंदिया यांनी घेत यांचा सुद्धा सत्कार या कार्य्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.