राजकुमार बडोले फाऊंडेशन च्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

  • आरोग्य शिबीरात २०८७ रुग्णांची तपासणी करण्यात आली

अर्जुनी मोरगाव, दि. 16 ऑगस्ट : राजकुमार बडोले फाऊंडेशन तर्फे अर्जुनी मोरगाव येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन आज 16 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरासाठी मेडीकल कॉलेज नागपूर, मेडीकल कॉलेज गोंदिया, आशा हाॅस्पीटल नागपूर, आशा नर्सिंग कॉलेज कामठी व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना शी संबंधित गोंदिया येथील सगळे डॉक्टर शिबिरात सहभागी झाले होते.

या शिबीरात मार्गदर्शन करताना माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील सामान्य माणसाचा इलाज करताना त्याला महात्मा फुले जन आरोग्य योजनेची, पंतप्रधान स्वास्थ योजना किंवा मुख्यमंत्री सहाय्यता योजनेचा लाभ मिळत नाही. त्या योजनांशी संलग्नित दवाखाने त्यांना माहीत राहत नाही. परीणामी त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होते.

या स्थिती तुन बाहेर पडण्यासाठी राजकुमार बडोले फाऊंडेशन व गंगा बाई मल्टिस्पेशालीटी हाॅस्पीटल व आशा हाॅस्पीटल सदैव साथ राहील. या शिबीरात कॅन्सर, ह्रदय रोग, दंतरोग, नाक कान घसा, स्त्री रोग, बालरोग, मानसीक रोग, चड्डी रोग, ईत्यादी रोगांची तपासणी करण्यात आली व योग्य उपचार करण्यात आले.

या शिबीरात २०८७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शिबीरात जि.प. गटनेते लायकराम भेंडारकर, भाजप तालुकाध्यक्ष विजय कापगते, मुकेश जैस्वाल, शैलेश शिवनकर, सौ.शारदा बडोले, डॉ. गजानन डोंगरवार, रामदास कोहाडकर, पं.स. सदस्य डॉ नाजुक कुंभरे, नुतन सोनवणे, शालीनी डोंगरवार, सरपंच मीना शहारे, नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता टेंभरे, नगरसेविका ममता भैय्या, इंदु लांजेवार, संध्या शहारे, एस आर देशमुख, भोजराज लोगडे, नगरसेवक राधेश्याम भेंडारकर, प्रकाश गहाणे, जितेंद्र साळवे, संतोष राठी, जयंत लांजेवार, संजय खरवडे, सुदाम कोवे, संजय बिस्वास आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबीराचे आयोजन राजकुमार बडोले फाऊंडेशन चे राकेश भास्कर, प्रशांत शहारे, उमेश पंधरे, प्रशांत उके, अमीत हुमणे व भाजपचे शैलेश शिवनकर, विजय कापगते, भोजु लोगडे, नुतन सोनवाने, येसु शहारे ईत्यादींनी केले. शिबीराचे संचालन राजहंस ढोके व अमीत हुमने यांनी केले व आभार प्रदर्शन लैलेश शिवनकर यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें