- महिलांनी मानले सरकार व खा. प्रफुल पटेल यांचे आभार
गोंदिया, दि. 16 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारने महिला सक्षमीकरणाचे दृष्टीकोनातून सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना खर्या अर्थाने महत्वाकांक्षी योजना ठरणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून रक्षाबंधन सणापुर्वीच राज्य सरकारकडून जुलै व ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रूपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास १४ ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे.
त्यानिमित्त १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी महिलांनी खा. श्री प्रफुल पटेल यांना राखी बांधून ३ हजार रुपये खात्यात जमा झाल्याने त्यांचे आभार मानले. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे उदात्त हेतु लक्षात घेवून राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे महिलांमध्ये देखील आशा पल्लवित झाल्या असून उत्साह दिसून येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचे सुद्धा महिलांनी आभार मानले. ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले नाही. त्यांनी अर्ज करावे, ज्यांचे अर्ज काही त्रृट्यामुळे नामंजूर झाले आहेत. त्या त्रृट्यांची पुर्तता करून घ्यावी, पात्र लाभार्थ्यांना निश्चितपणे योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे. अशी ग्वाही माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली.