- अखिल भारतीय सरपंच परिषद मध्ये समावेश करण्याचा घेतला निर्णय.
- १६-२८ ऑगस्ट पर्यंत सुरू असणाऱ्या काम बंद आंदोलनाला पाठिंबा
सडक अर्जुनी, दि. १६ ऑगस्ट : स्थानिक पंचायत समिती चे सभागृह मध्ये तालुका सरपंच संघटनेची मासिक सभा तालुका अध्यक्ष हर्ष मोदी यांच्या अध्यक्षतेत आज १६ रोजी संपन्न झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय सरपंच परिषद या संघटनेत संपूर्ण तालुका संघटनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय अखिल भारतीय सरपंच परिषदांच्या वतीने दिनांक १६ ते २८ ऑगस्ट पर्यंत पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला सुद्धा तालुका सरपंच संघटनेचा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला. संघटनेत एकूण ६३ सरपंचांचा समावेश असून या बैठकीत ४७ सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते. तालुक्यातील उपसरपंच यांना सुद्धा संघटनेत समावेश करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे संघटनेच्या व्याप वाढणार आहे.
असेही अध्यक्ष हर्ष मोदी यांनी आपल्या मार्गदर्शनात माहिती दिली. यापुढे दर तीन महिन्यात संघटनेची मासिक सभा आयोजित केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या वतीने बामणी/सावंगी येथील सरपंच माधव तरोणे यांची जिल्हास्तरीय समितीसाठी नियुक्ती करण्यासंबंधी सुद्धा ठराव घेण्यात आले.
यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष हर्ष मोदी यांच्यासह गंगाधर परशुरामकर, सचिव विलास वट्टी, महिला तालुका प्रमुख शर्मिला चिमणकर, उपाध्यक्ष भारती लोथे, प्रशांत बालसनवार, सहसचिव प्रतिभा भेंडारकर, कोषाध्यक्ष गुलाब तोंडफोडे, नितीश गुरनुले, किरण हटवार, योगेश्वरी चौधरी, कुंदा काशीवार व इतर सरपंच उपस्थित होते.