ध्वजारोहण कार्यक्रम खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते संपन्न.

गोंदिया, दि. 16 ऑगस्ट :  स्वातंत्र्यदिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे खा. प्रफुल पटेल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर संविधानाची प्रास्ताविका चे वाचन व संविधान सभेचे आयोजन करण्यात आले. श्री पटेल यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

भारताला गुलामीच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना नमन करून भारतीय संविधानाचा आत्मा असलेल्या प्रास्ताविका चे वाचन करण्यात आले. संविधानाचा जागर करणे, देशाची संवैधानिक मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्यायासाठी शिव – शाहू – फुले- आंबेडकर यांच्या कार्याला घराघरात पोहचविण्याचे कार्य राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे असे संविधान सभेला संबोधित करतांना खा.श्री प्रफुल पटेल म्हणाले. कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेखा माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी सांभाळली.

ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी भारतीय सैन्य सेवेतुन निवृत झालेल्या माजी सैनिकांचे खा.श्री पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरवान्वित करण्यात आले. यावेळी शहरातील गणमान्य नागरिक, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें