- NHAI कार्यालयाला कुलूप बंदच्या इशाऱ्यावर कामाला आली गती.
- सप्टेंबर पर्यंत काम सुरू करण्याची दिली हमी – सरपंच हर्ष मोदी यांच्या मागणीला यश.
गोंदिया, दि..16 ऑगस्ट : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वरील सौंदड येथील उडान पुलाचे कार्य मागील अनेक वर्षापासून रडखले आहे. याच मार्गावर यानंतर प्रस्तावित केलेले उडान पूल पूर्णत्वास येऊन सध्या कार्यरत आहेत, परंतु सौंदड येथील उडानपुलाला मुहूर्तमेढ काही सापडत नाही. स्थानिक नागरिकांची सहनशक्तीची पराकाष्ठा झाल्यावरही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला मात्र काही जाग येत नव्हता.
त्यावर स्थानिक ग्राम पंचायत सरपंच हर्ष मोदी यांनी कंत्राटदार हटाव चा नारा देत भीक मांगो आंदोलन करून भिकेतून जमा झालेले पैसे कंत्राटदाराला सुपूर्त केले. त्याचाच पडसाद म्हणून प्राधिकरणाने कंत्रात दाराला निलंबित केले व सदर उड्डाण पुलाचे कार्य तात्काळ सुरू व्हावे यासाठी फेरनिविदा काढून कामाला गती दिली.
त्यातच सर्विस रोड संबंधीचे नागरिकांच्या समस्या सुटता सुटेना त्यावर तात्काळ उपाययोजना करावेत यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार विनंती अर्ज करण्यात आले होते, परंतु त्यावर तंत्रज्ञान व प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणतेही लक्ष न देता दुर्लक्षित करण्यात आले. 29 जुलै रोजी ग्रामपंचायत च्या वतीने पुलाचे बांधकाम व सर्विस रोड दुरुस्तीचे कार्य तात्काळ सुरू करा अन्यथा प्राधिकरणाच्या कार्यालयास ताला ठोको आंदोलन करण्यात येईल अशा इशारा वजा पत्र दिला होता.
त्यासंबंधी 14 ऑगस्ट रोजी ग्राम पंचायत सौंदड येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समवे ग्रामवासीयांची बैठकीची आयोजन करण्यात आले होते, या बैठकीत उडान पुलाचे व सर्विस रोडचे काम का प्रलंबित आहे, यासंबंधी उपस्थित अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितले. त्यावर गावकऱ्यांचे समाधान करून सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत निवेदन कार्य पूर्ण होऊन नवीन कंत्राटदाराला तात्काळ कार्य सुरू करण्यासाठी आदेश दिले जाईल असे आश्वासन दिल्यावर नागरिकांनी ताला ठोको आंदोलन तात्पुरता स्थगित केला असून यावरील पुढील निर्णय सप्टेंबर मध्येच घेतले जाईल अशी माहिती सरपंच हर्ष मोदी यांनी दिली.
या बैठकीत उडान पुलाशिवाय इतर अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये ग्राम पंचायतीच्या वतीने उडान पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे, गावाचे वेशीवर असलेले नामफलक बसविणे, बस स्थानक, सर्विस रोडला पथदिव्यांची व्यवस्था, पुलाखालील रिकाम्या जागेत गार्डन व सौंदर्यकरणाचे कामे अश्या अनेक विषयासंबंधी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत ही सर्व कामे नियोजनात असून लवकरच करण्याचे आश्वासन दिले.
दिलेल्या आश्वासनावर प्राधिकरण कायम नसल्यास परत आंदोलनाची भूमिका घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही यावेळी सरपंच हर्ष मोदी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बजावले. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला उडन पुलाचा व सर्विस रोडचा विषय लवकरच मार्गी लागेल असे यावरून दिसून येत आहे.
