माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी DPDC च्या पदाचा दिला राजीनामा

गोंदिया, दि. 14 ऑगस्ट : गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या आमंत्रित सदस्य पदाचा आज राजीनामा दिला आहे. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यलयात आज ( दि. 14 रोजी ) गोंदिया जिल्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा नियोजन समिती ची सभा आयोजित करण्यात आली होती.

तर या सभेला गोंदिया जिल्यातील खासदार, आमदार तसेच काही माजी आमदार यांना आमंत्रित सदस्य म्हणून बोलविण्यात आले मात्र गोंदिया विधानसभा क्षेत्रातील समस्या ठेवण्यासाठी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आवाज उचली असता पालक मंत्र्यांनी माजी आमदार गोपाल दास अग्रवाल यांना बोलण्यास आडवील्याने गोपालदास अग्रवाल यांनी सभा त्याग करित बाहेर पडत पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची ताणासाही सहन करणार नाही त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या आमंत्रित सदस्य पदाचा राजीनामा उप मुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

तर मागील दोन वर्षा पासून जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदाच्या निवडणुका न झाल्याने कायम स्वरूपी सदस्य नाही त्यामुळे पालक मंत्री तानासाही करतात असा आरोप माजी आमदार गोपाल दास अग्रवाल यांनी केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें