वाहतूक निरीक्षक अधिकाऱ्यामुळे जनता त्रस्त, काँग्रेस चे निवेदन, करू आंदोलन!

गोंदिया, दि. 14 ऑगस्ट : सडक अर्जुनी परिसरामध्ये परिवहन निरीक्षकाच्या त्रासामुळे जनता त्रस्त झाली आहे. स्थानिक सौंदड, कोहमारा, गोरेगाव, सडक /अर्जुनी येथील परिसरात वाहतूक निरीक्षक अधिकाऱ्याकडून नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

उभ्या असलेल्या गाड्यांना पाच ते दहा हजार रुपये दंड आकारले जात असून त्यांच्या विरोधात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने लेखी निवेदन देत तक्रार नोंदविण्यात आली आहे. परिसरातील छोटे व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.

संबधीत अधिकारी यांची चौकशी करून नागरिकांना होणारे त्रास देणे बंद करावे. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. या प्रसंगी प्रदेश प्रतिनिधी नीलम हलमारे ( परिवहन विभाग) , तालुकाध्यक्ष शंकर भाऊ मेंढे (परिवहन विभाग), डॉ. अजय लांजेवार , सत्तार भाई छवारे, साहेबराव पंचभाई, व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें