एकाच दिवशी सर्पमित्रांनी दिले पाच सापांना जीवनदान

सडक अर्जुनी, दि. 14 ऑगस्ट : नुकतेच नाग पंचमी चे सन सर्वत्र साजरा झाले आणि तालुक्यात अनेक ठिकाणी सर्प मित्रांना साप मिळाले आहेत. आज दि. 14 ऑगस्ट रोजी 1) हेमराज कापगते ग्राम माहुली, शिंदीपार यांच्या शेतात भारतीय अजगर जातीचा साप मिळाला, 2) बापूदास तिरपुडे पोलीस पाटील सालई, वांगी येथे मण्यार जातीचा विषारी साप मिळाला, 3) लालाजी मोतीराम डोंगरवार सौंदड यांच्या इथे विषारी नाग जातीचा साप मिळाला, 4) सर्पमित्र पराग लाडे यांच्या इथे मण्यार जातीचा साप मिळाला, 5) मंगेश तरोने सौंदड यांच्या इथे नाग जातीचा साप मिळाला असून यात विषारी सापांचा समावेश आहे. एकूण पाचही सापांना पकडून सर्पमित्रांनी सिंदीपार जंगल येथे मोकळ्या अधिवासात सोडून त्यांना जीवनदान दिले आहे.

सर्प मित्र पराग लाडे, संघर्ष जनबंधू , पप्पी इंगळे, विक्की चुटे यांनी सदरची कामगिरी केली आहे. साप आढळल्यास सापांला पकडण्याची किंवा मारण्याचे प्रयत्न करू नये अथवा सापाजवळ जाण्याचा विचार करू नये, साप अत्यंत विषारी पण असू शकतो, किंवा साप बिनविषारी पण असू शकतो, साप दिसल्यास जवळच्या सर्पमित्रांना भ्रमण ध्वनी वरून संपर्क करावे, आणि त्यांना त्याची माहिती द्यावी असे अव्हाहन सर्पमित्र लाडे यांनी केले आहेत. 

 

Leave a Comment

और पढ़ें