दानेशभाऊ साखरे यांच्या नेतृत्वात सडक अर्जुनी तालुक्यातील महिलांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

सडक अर्जुनी, दिनांक : 14 ऑगस्ट 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दि. 14 ऑगस्ट रोजी महिला मेळाव्याचे आयोजन गोंदिया येथील कटंगी येथे करण्यात आले होते, दरम्यान शेकडो महिलांनी सदर कार्यक्रमाला हजेरी लावली होती, सदर कार्यक्रम खा. प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.

अर्जुनी मोर, विधानसभा क्षेत्रातील युवा नेतृत्व अशी ओळख असलेले दानेशभाऊ साखरे यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रमात सडक अर्जुनी तालुक्यातील 35 ते 40 महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष व अर्जुनी मोरगाव येथील नगर पंचायत चे नगरसेवक असलेले दानेशभाऊ साखरे हे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे मिशन 2024 हाती घेऊन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून आहेत, त्यामुळे यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक महिलांनी खासदार प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

लाडक्या बहिणींनी खा. प्रफुल पटेलांना बांधली महिला मेळाव्यात राखी.

गोंदियात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आज गोंदियाच्या कटंगी गावात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता मेळाव्यात आलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी खा. प्रफुल पटेल यांना राखी बाधली आहे. लाडकी बहीण योजनेचा निधी मिळण्याआधीच राखी बांधली असून बहिणीनी दिलेला प्रेम पाहता खा. प्रफुल पटेलांनी पुढचे पाच वर्ष ही योजना बंद पडणार नसल्याचे सांगितले तर राखी बांधून चालणार नाही तर निवडणुकीत देखील माझ्या सोबात उभे रहण्याची विनंती खा. प्रफुल पटेलांनी लाडक्या बहिणीना केली आहे. तर बहिणी देखील खा. प्रफुल पटेलांचे आभार मानले आहे.

Leave a Comment

और पढ़ें