गोंदिया, दि. 13 ऑगस्ट : जिल्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणारा बोंडगाव देवी गावात अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार बोंडगाव देवी येथे वन्य प्राणी अस्वल ही रस्त्याच्या कडेला पडून असल्याची माहिती निमगाव येथील नागरिकांनी वन विभागाला भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली, माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित झाले.
घटनास्थळाची पाहणी केली असता निमगाव ते बोंडगाव/देवी दरम्यान अर्जुनी ते साकोली रस्त्याने निमगाव जवळ एक वन्य प्राणी अस्वल मादी मृतावस्थेत दिसून आली. अधिक तपास केले असता सदर वन्यप्राणी अस्वलाचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेने सकाळच्या चार ते पाच वाजेच्या दरम्यान 12 ऑगस्ट रोजी झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 149