गोंदिया, दि. 13 ऑगस्ट 2024 : लाडकी बहीण योजने पासून गोंदिया जिल्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहू नये म्हणून गोंदियात अजित पवार याच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने जण जागृती करण्यात येत असून आज 12 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र जैन , सभापती पूजा अखिलेश सेठ यांनी पत्र परिषद घेत या योजने बद्दल माहिती दिली
मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने १ जुलै पासून महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरु केली असून ३१ आगस्ट पर्यंत फॉर्म भरणायची अंतिम तारीख आहे. तर राज्यात गोंदिया जिल्हा हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यात नंबर एक वर असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र जैन, गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ यांनी दिली आहे.
तर जिल्यात एकही महिला लाडकी बहीण योजने पासून वंचित राहू नये म्हणून गोंदियात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने जिल्यात ठीक ठिकाणी शिबीर राबविण्यात येत आहे तर राष्ट्रवादी कॉग्रेस देखील कामाला लागली आहे.
तर ज्या महिलांचे किंवा कुटूंबियांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे अस्या महिलांनी या योजनेचा अर्ज भरायचा आहे तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल केला अश्या लाडक्या बहिणींना रक्षा बंधन म्हणजे 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांची एकत्र किस्त 3000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र जैन यांनी दिली आहे.
