धान घोटाळ्या प्रकरणी गोंदियातील तीन दलाल ईडीच्या रडारवर.

तिन व्यापाऱ्यांची झाली चौकशी, छतीसगड येथिल धान घोटाळ्याचे कनेक्शन.

गोंदिया, दि. 13 ऑगस्ट 2024 : छत्तीसगडमध्ये गेल्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या धान घोटाळ्याच्या चौकशीकरीता धान व तांदळाची दलाली करणाऱ्या गोंदिया येथील तीन दलालांच्या प्रतिष्ठानांची रायपूर येथील ईडीच्या चमूने चौकशी करून काही कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी तीनजणांना रायपूर येथे ईडीने चौकशीसाठी बोलाविले आहे.

छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात कस्टम धान भरडाई घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची विद्यमान छत्तीसगड सरकारने ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे.

आतापर्यंत याप्रकरणी छतीसगड येथिल तीन ते चार बड्या अधिकाऱ्यांना अटकसुद्धा करण्यात आली आहे. शुक्रवारी रायपूर येथून आलेल्या ईडीच्या पथकाने गोंदिया शहरातील तांदळाची दलाली करणाऱ्या तीन मोठ्या दलालांच्या प्रतिष्ठानांवर धाड टाकून कस्टम भरडाई संदर्भातील व यासंबंधित झालेल्या आर्थिक व्यवहाराशी निगडित काही कागदपत्रे जप्त केली आहे. या कारवाईमुळे धान व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Leave a Comment

और पढ़ें