गोंदिया विधानसभा सीट राजेंद्र जैन यांनी लढावी कार्यकर्त्यांनी दिल्या वाढदिवसा निमित्त सुभेच्या !

आता आमच्याकडे तुमसर आणि अर्जुनी मोरगाव ची सीट आहे : आमदार मनोहर चंद्रिकापुरे

गोंदिया, दि. 09 ऑगस्ट 2024 : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कर्मठ नेता श्री. राजेंद्र जैन यांचे वाढदिवस निमित्त कार्यक्रम दी. 08 ऑगस्ट रोजी गोंदिया येथील एन. एम. डी. कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाला गोंदिया भंडारा जिल्यातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत गोंदिया विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढवून प्रतिनिधित्व करण्याची विनंती केली तर राजेंद्र जैन यांनी देखील महायुती च्या वतीने संधी मिळाली तर नक्कीच गोंदिया विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व करेन असा शब्द दिला आहे. 

खा. प्रफुल पटेल यांचे विश्वाशू म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख असून त्यांच्या वतीने गोंदिया भंडारा जिल्यात अनेक सामाजिक उपक्रम जिल्यात राबविले जातं असून आज देखील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसा निमित्ताने गोंदियात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तर जिल्हा समान्य रुग्णालयात रुग्णाना फळ वितरण करण्यात आले.

गोंदिया शहरातील एन एम डी कॉलेज च्या ऑडिटोरियल हॉल मध्ये त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यानी केक कापून साजरा केला तर या वेळी आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे,. सहकार महर्षी सुनील फुंडे यांच्या शह अनेक नेते कार्यकर्त्यानी पुष्प गुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर राजेंद्र जैन यांच्या चाहत्यांनी गोंदिया शहरात ठीक ठिकाणी होर्डिंग लावत शुभेच्छा दिल्या आहेत.

आता आमच्याकडे तुमसर आणि अर्जुनी मोरगाव ची सीट आहे : आमदार मनोहर चंद्रिकापुरे

आमचा प्रयत्न आहे की महायुती मध्ये या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमसर, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा येथून तीन सिटांवर निवडणूक लढवली होती, आता आमच्याकडे ऑलरेडी तुमसर आणि अर्जुनी मोरगाव ची सीट आहे, आणि तिसऱ्या सीट करिता हाय कमांड जे निर्णय घेतील, परंतु आम्ही कार्यकर्ता म्हणून आमचा प्रयत्न आहे, की गोंदिया येथून मा. राजेंद्र जी जैन हे जर खरोखर महायुतीतून राष्ट्रवादी चे उमेदवार होत असतील तर ताकतीने गोंदिया विधानसभेची सीट आम्ही काढू शकतो, त्यामुळे आम्ही सर्व लोक या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलो आहोत, आणि माझी ईच्या आहे की, महायुतीमध्ये शेवटचा निर्णय आमचे नेता प्रफुल पटेल घेतील, आणि त्यानंतर युतीमध्ये असलेले सर्व नेते ते एकत्र बसून जी निर्णय घेतील ते शेवट निर्णय सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि दि. डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक भंडारा चे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी देखील येत्या विधानसभा मध्ये राजेंद्र जैन यांनी गोंदिया विधानसभा येथून निवडणूक लढावी आणि ते निवडून यावे अशा आशयाचे वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत, त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें