गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दि. 09 ऑगस्ट 2024 : नागपूर – रायपूर गावर्गावरील गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी व देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर अनेक ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे, या उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे वाहणधारक कंटाळले आहेत, या उड्डाण पुलाच्या बाजूने जाणारे सर्विस मार्ग संपूर्ण फुटलेल्या अवस्थेत अशल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी राहते दोन दोन दिवस या भागात वाहतूक ठप्प राहते तो त्रास सुरूच आहे की दुसरीकडे याच मार्गावर अग्रवाल ग्लोबल कंपनी मार्फत उड्डाण पुलाचे आणि माहामार्गाचे काम सूरु आहे.
त्याच पूलाची भिंत पडली आहे, तर काही दिवसापूर्वी याच भागातील उड्डाण पूलाला मोठे भगदाड पडले होते. या कंपनी मार्फत सुरू अशलेले नव निर्माण कार्य किती निक्रूस्ठ दर्जाचे होत आहे, यावरून लक्ष्यात येते असे अशले तरी स्थानिक लोक प्रतिनिधींचे मात्र सर्रास दुर्लक्ष होत अशल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महामार्गाच्या सुरू कामामुळे वाहणधारक त्रासले आहेत, कधी काम होते आणि कधी मार्ग मोकळा होतोय असा प्रशन पडला आहे.
सुरू अशलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामात पावर प्लांट मधून निघणाऱ्या राखडीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने पावसाची दमदार हजेरी होताच सर्व प्रकार आता बाहेर येऊ लागले आहे. या पुलावर पंधरा दिवसा आधी मोठा खड्डा पडला होता तर दोन दिवसा आदि रात्री दमदार पावसाने हजेरी लावल्याने नव निर्मित उड्डाण पुलाची भिंत खाली कोसडली आहे.
सुदैवाने कुठलीही जिवंत हानी झाली नसली तरी उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोड वरील वाहण चालकाच्या बोनेट वर भिंतीचे गट्टू पडल्याने कार चालकाचे नुकसान झाले आहे, गेल्या पंधरा दिवसात आलेल्या दमदार पावसाने अग्रवाल कंपनीच्या बांधकामची पोल खोल केली आहे, तर दुसरीकडे मासुलकसा घाटात बांधण्यात आलेला उडाण पूल या आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती होती, मात्र उड्डाण पुलाची भिंत कोसडल्याने बांधकामावर प्रशन चिन्ह निर्माण झाल्याने हा पूल कधी सुरु होते या कडे र्सवांचे लक्ष लागले आहे.