नवी दिल्ली, वृत्तसेवा, दि. 09 ऑगस्ट 2024 : भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे.
नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो फाऊल गेले पण त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये ८९ मी चा टप्पा गाठला आणि अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तानचा अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आला आहे. तर तिसरा क्रमांक ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटरसह मिळवला.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 92