अजय लांजेवार यांच्या पुढाकाराने, कावड यात्रेचे आयोजन

गोंदिया, दि. ०९ ऑगस्ट : सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण बाबा देवस्थान ते शिवमंदिर देवस्थान उकारा तालुका साकोली पर्यंत १०८ कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता शशीकरण बाबा देवस्थान येथून कावड यात्रेला सुरुवात झाली. कावड यात्रेमध्ये गोंदिया जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी चे वंदनाताई काळे, पुष्पा खोटेले, तालुकाध्यक्ष किरण हटवार, तालुकाध्यक्ष शीला उईके अर्जुनी /मोर, लता गहाणे सरपंच फुटाळा, रसिका कापगते, वंदनाताई धोटे, डॉ. रिता लांजेवार, महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

४ वाजता रुद्राभिषेक सोहळा व महाप्रसाद चे आयोजन शिव मंदिर देवस्थान उकारा येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष जयश्रीताई बोरकर, छायाताई पटले, जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते, नलिनीताई नेवारे, कल्याणी कापगते, जयश्री मेश्राम, कीर्ती राऊत, फुलनबाई धुर्वे,उपस्थित होते.

या कार्यक्रमाकरिता डॉ. अजय लांजेवार व डॉ. रीता लांजेवार यांच्या सहकार्यातून ही कावड यात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. कावड यात्रा यशस्वी करण्याकरिता प्रदेश उपाध्यक्ष नीलम हलमारे परिवहन विभाग, जिल्हाध्यक्ष प्रदीप सहारे रोजगार व स्वयंरोजगार विभाग, तालुकाध्यक्ष शंकर मेंढे परिवहन विभाग, तालुकाध्यक्ष दिवाकर चुटे रोजगार व स्वयंरोजगार विभाग अर्जुनी/ मोर, तालुका अध्यक्ष विलास कापगते रोजगार व स्वयंरोजगार विभाग सडक /अर्जुनी, युवा संकल्प अध्यक्ष युवराज अंबुले, शिव मंदिर कमिटीचे अध्यक्ष गणेश खोटेले, डॉक्टर शामकांत नेवारे, अरविंद मरस्कोल्हे, तेजराम कापगते, सचिन वालदे, वासुदेव भोंडे, रणधीर मेश्राम, व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते महिला भगिनी तसेच पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वाहतूक नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कावड यात्रेकरिता सहयोग दिले. कावड यात्रेत सहभाग घेतल्याबद्दल महिला भगिनींचे आभार डॉ. रिता लांजेवार यांनी मानले. 

 

Leave a Comment

और पढ़ें