सडक अर्जुनी, दिनांक : 09 ऑगस्ट 2024 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका येथील ग्राम कोहमारा येथे दि. 07 ऑगस्ट रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पण करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, मंचावर उपस्थित शैलेश जायस्वाल शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, बालाजी परब विधानसभा संपर्कप्रमुख, राजू हेडाऊ, शितल मंडारी, राजू पटले, महेश डुमरे, मनोज रामटेके सह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 282