गोंदिया, दि. 09 ऑगस्ट : जिल्हारिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित लोकार्पण, सत्कार सोहळा व आरोग्य शीबीर ला क्षेत्रातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. अतिदुर्गम आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त डोंगराळ भागात वसलेला क्षेत्र म्हणून गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्राची ओळख आहे. गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्राचा विकास करण्यासाठी इंजि यशवंत गणविर यांनी कोट्यावधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिली आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. आजपर्यंत बरेच जिल्हा परिषद सदस्य झाले, पदाधिकारी होऊन गेले परंतु उपाध्यक्ष पदावर काम करताना यशवंत गणविर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सरपंच व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे शितशवपेटी व सकुली (तिरडी) चे वाटप करण्यात आले. गोठणगाव येथील वार्ड क्रं २ मधील अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. अंगणवाडी मधे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. गावात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परीचारीकेचा सत्कार करण्यात आला आहे. यामध्ये सरपंच संजय ईश्वार, गणेश ताराम, पुष्पाताई डोंगरवार, नरेंद्र लोथे, दयाराम लंजे, बळीराम टेंभुर्णे, पपिताताई नंदेश्वर, करणदास रक्षा व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमधे रतिराम राणे माजी जि.प.सदस्य, दिनदयाल डोंगरवार माजी पं.स.सदस्य, दिलीप तिरपुडे, तुषार बनपुरकर, सौरभ पशिने, तेजराम राउत, सदाशिव घुगुसकार, जागेश्वर मते, कलिराम काटेंगे, भिमराव नंदेश्वर, रवींद्र नाईक, पुरुषोत्तम कोरे, प्रेमलाल नागपुरे, क्रिष्णा मांडवे, हरिश्चंद्र घरतकर, हेमराज मेश्राम, विशाखा लोथे, भरत गजापुरे, अशोक सरकार, श्रीनिवास चक्रवर्ती, सुभाष तिरगम, सिताराम वलके, नितेश कुंभरे, विश्वेश्वर कांबळे, सुखदेव कनोजे, गोपाल नंदेश्वर, ताराचंद ठवरे, दिलीप खोब्रागडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन 04 ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे यांच्या शुभहस्ते व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, युवक राकापा विधानसभा अध्यक्ष योगेश नाकाडे, युवक राकापा तालुकाध्यक्ष किशोर ब्राह्मणकर, महिला राकापा तालुकाध्यक्ष सुशिला हलमारे, पं.स.सदस्य आम्रपाली डोंगरवार, युवती तालुकाध्यक्ष हर्षा राउत, संजय ईश्वार सरपंच गोठणगाव, उपसरपंच कांतीलाल डोंगरवार, आदिवासी विविध सह.संस्था अध्यक्ष रवींद्र घरतकर, उपाध्यक्ष रघुनाथ मेश्राम, माजी जि.प.सदस्य रतिराम राणे, दानेश साखरे नगरसेवक अर्जुनी मोरगाव, राजेंद्र जांभुळकर, उद्धव मेहंदळे, ग्रामपंचायत सदस्य रतिराम कोडापे, दिपक राणे, मनोज रामटेके, कविता परतेकी, सुनंदा काटेंगे, रीना राणे सर्व ग्रामपंचायत सरपंच व क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.