उर्वरित शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी बाबत सरकार उदासीन : ललित कुमार बाळबुद्दे, 15 ऑगस्ट नंतर करू आमरण उपोषण

गोंदिया, दि. 08 ऑगस्ट : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अर्जुनी मोरगाव चे अध्यक्ष ललित कुमार बळबुद्दे यांनी आपल्या सिस्टि मंडळासह आज दि. 08 ऑगस्ट रोजी उर्वरित शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी संदर्भात कार्यालयाला भेट दिली असता जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांच्या सोबत आजपर्यंत शासनासी केलेल्या पत्रव्यवहार तसेच प्रत्येक्षातील भेटीगाठी यावर चर्चा केली.

शासनाला जिल्हा उपनिबंध कार्यालयातून संम्पूर्ण तालुक्या च्या याद्या, प्रोत्साहन राशीपासून वंचीत असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सहकार मंत्री कार्यालय मुंबई येथे पाठविले असल्याचे कळले, जिल्ह्यात प्रोत्साहन राशी संदर्भात शासनाने अन्यायकारक धोरणाचे अंगीकार केलेले आहे, प्रत्येक्षात शिष्ट मंडळ सह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.

मुंबई येथील त्यांच्या कार्यालयाला निवेदन दिले, अजित पवार उपमुख्यमंत्री यांना पण निवेदन दिले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले, चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन सहकार मंत्र्यांसोबत प्रत्यक्षात बोलावून घेतले, सहकार आयुक्त पुणे यांची प्रत्यक्षात भेट घेतली.

अर्जुनी मोरगाव ते मुंबई असा प्रवास केला त्याचा काहीही फायदा जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करताना झालेला नाही, असे दिसुन आले, अजूनही उर्वरित शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी बाबत सरकार उदासीन असल्याचे कळले, शेतकऱ्यांची मागणी शासन दरबारी थंड बस्त्यामध्ये आहे, त्या कारणाने जिल्हा उपनिबंधक साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर विविध कार्यकारी सेवा सहकारी जिल्हा संघ आणि गोंदीया जिल्ह्यातील प्रत्येक तालुका संघ हा 15 ऑगस्ट नंतर उर्वरित शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी संदर्भात साखळी उपोषण या मार्गावर आणि नंतर आमरण उपोषण करेल यामध्ये जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी बाकी आहे.

त्यांना या संघटनेद्वारे 15 ऑगस्ट नंतर आंदोलनासाठी प्रत्येक तहसील कार्यालया समोर उपस्थित राहून प्रोत्साहन राशी संदर्भात आपल्या हक्काची लढाई लढण्याकरिता या संघटनेच्या द्वारे आव्हान करीत असल्याची माहिती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अर्जुनी मोरगाव चे अध्यक्ष ललित कुमार बाळबुद्दे यांनी केल आहे. 

Leave a Comment

और पढ़ें